स्थलांतर प्रणाली विषयी

महाराष्ट्र राज्यात स्थलांतराचे प्रमाण अधिक असून यामध्ये जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा, आंतरराज्य स्थलांतर यांचा समावेश आहे. अनेक ग्रामीण कुटुंबांसाठी तणावपूर्ण स्थलांतर (डिस्ट्रेस माइग्रेशन) हे वास्तव आहे. सदरील स्थलांतर विविध स्वरूपात आहे जसे वीटभट्टी कामगार, शेतमजुरी, ऊसतोड व साखर कारखाने किंवा इतर उद्योग इत्यादी. हे हंगामी स्थलांतर काही वेळा सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकणारे असून स्थलांतरित कुटुंबातील बालके, किशोरवयीन मुली, गरोदर आणि स्तनदा महिलांच्या आरोग्य व पोषण स्थिती व सुरक्षिततेवर सर्वाधिक परिणाम करते. या स्थलांतराच्या कालावधीदरम्यान सार्वत्रिक आरोग्य आणि पोषण लाभ/योजनांची परस्पर कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम (महा एमटीएस) ची परिकल्पना करण्यात आली आहे, जेणेकरुन स्थलांतरित लाभार्थ्यांसाठी सदरील सेवा वितरण अखंडितपणे सुरु राहील. यामध्ये लसीकरण, आरोग्य तपासणी, एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) आणि एकात्मिक बाल संरक्षण सेवा (ICPS) इ. सेवा अंतर्भूत आहेत.

यावर्षी 2021-22 मध्ये महा एमटीएस प्रणाली अंमलबजावणीकरिता अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, जालना, नंदुरबार आणि पालघर या 6 स्त्रोत जिल्ह्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. या पथदर्शी प्रकल्पाचे अभ्यासावरून पुढील टप्प्यात महा एमटीएस प्रणालीचे राज्यव्यापी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. महा एमटीएस प्रणाली तांत्रिक उपयोजनांसोबत प्रशासकीय यंत्रणा, टोल-फ्री हेल्पलाईन आणि इतर नाविन्यपूर्ण मार्गांसह काम करत आहे; ज्यामुळे आमच्या अंगणवाडी सेविका (AWW), आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मजबूत संपर्कजाळ्याद्वारे आम्हास अधिकाधिक स्थलांतरित लोकांपर्यंत पोहोचता येईल.

महा एमटीएस प्रणाली सॉफ्टवेअरसंबंधी कोणतेही प्रश्न किंवा अभिप्रायासाठी कृपया आमच्याशीसंपर्क साधा.

This website is owned by Maha MTS
Developed & Maintained by SETTribe IT Solutions